kaas pathar | कास पठार | रानफुलांनी बहरलेलं एक अनोखं विश्व

 

kaas pathar | कास पठार | रानफुलांनी बहरलेलं एक अनोखं विश्व


सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील कास पठार रानफुलांनी बहरलेलं एक अनोखं विश्व आज जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे

        

     कास पठार हे तिथल्या दुर्मिळ प्रजातींच्या फुलांमुळे ओळखले जात‌ असुन युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षीत यादीत (unesco world heritage) २०१२ साली सामाविष्ट करण्यात आले आहे

           तसेच २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील ७ आश्चर्यांच्या यादीत देखील कास पठाराला स्थान मिळाले आहे.

    

ज्वालामुखीय खडका पासून तयार झालेल्या या पठारावर 

विविध रंगांच्या फुलझाडांनी नटलेली हि दुनिया अनेक प्रजातीच्या फुलपाखरांना आकर्षीत करते.


कास पठार समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर आहे, व या परीसराचे क्षेत्रफळ जवळ जवळ १० ते ११ चौरस किलोमीटर इतके आहे.


 या पठारावर फुलांच्या ८६० प्रजाती सापडतात, त्यातील ६२४ प्रजाती "इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर"(uicn) मध्ये रेड लीस्टेट आहेत.kaas pathar booking

कास पठाराला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकींग करणे अनिवार्य आहे 


Kas.ind.in या संकेतस्थळावर आपण ticket बुकींग करु शकाल ( फुलं बहरण्याचा सीझन संपल्यावर ticket बुकींग बंद केली जाते )


प्रति व्यक्ती प्रवेश शुल्क १०० रुपये इतके आहे.

 सायकलचे दर ताशी ५० रुपये इतके आहे (सायकल घेता वेळी आपल्या जवळुन काही रक्कम Diposit म्हणून ठेवली जाते)

गाइड हवा असल्यास दहा जणांच्या ग्रुपकडून एका गाइड साठी १०० रुपये आकारले जातात 

५ वर्षांखालील मुलांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही


दिवसभरात कास पठाराला भेट देण्यासाठी ३००० पर्यटकांची संख्या मर्यादित केली गेली आहे 

आणि या पर्यटकांची विभागणी तीन भागात केली जाते


सकाळी 7.00 ते 11.00 - 1000 पर्यटक


सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 - 1000 पर्यटक


दुपारी 3.00 ते संध्याकाळी 6.00 - 1000 पर्यटक (या स्लॉटसाठी, अहवाल देण्याची वेळ दुपारी 3.00 ते 4.00 पर्यंत अनिवार्य आहे) करण्यासारखे आणि पाहण्यासारखे आणखीन काही

कास नाईट जंगल सफारी : या सफारी करीता प्रत्येकी ८ जणांच्या ग्रुपकडून एका जीप साठी ४००० रुपये आकारले जातात.

कास परीसर दर्शन: कास तलाव, घाटाई देवी मंदिर, अजिंक्यतारा किल्ला, तांबी येथून वजराई वॉटरफॉल (दुरुन), कोयना बॅक वॉटर दर्शन (दुरुन), सह्याद्रीनगर (पवनचक्की), वेण्णा व्ह्यु, एकीव धबधबा, आणि नवरानवरीचा डोंगर राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था
 

या परीसरात आपल्याला अनेक रेस्टॉरंट्स मिळतील जेथे महाराष्ट्रीयन व सातारी पद्धतीचं जेवण मिळतं 


या ठिकाणी राहण्यास अनेक सुविधा उपलब्ध असुन सर्वात जवळचे MTDC रेसॉर्ट्स ३८.५ किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर येथे आहे.


कास पठार या पर्यटन स्थळा पर्यंत कसे पोहचाल

फलटन विमानतळ सातारा हे कास पठारा पासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे.


तसेच जवळचे रेल्वे स्टेशन सातारा रेल्वे स्थानक कास पठारा पासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.


सातारा शहरातुन कास पठाराला जाण्यासाठी बसेस व कॅबस् उपलब्ध आहे‌त


  • मुंबई ते कास पठार हे अंतर २७८ किलोमीटर इतके आहे.
  • पुणे ते कास पठार हे अंतर १३६ किलोमीटर इतके आहे.
  • नागपूर ते कास पठार हे अंतर ८१३ किलोमीटर इतके आहे.
  • रत्नागिरी ते कास पठार हे अंतर २१२ किलोमीटर इतके आहे.टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने