कामशेत | kamshet | हे ठिकाण आज भारतातील paragliding राजधानीत म्हणून ओळखले जाते

 

कामशेत | kamshet | हे ठिकाण आज भारतातील paragliding राजधानीत म्हणून ओळखले जाते


पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेले कामशेत हे ठिकाण आज भारतातील paragliding राजधानीत म्हणून ओळखले जाते, सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, आणि निळेशार सरोवर या हिलस्टेशनचं वैशिष्ट्य.


  कामशेत येथे आपण आॉक्टोबर ते जून या कालावधीत  पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकता, पावसाळ्यातील चार महिने येथील पॅराग्लायडिंग पुर्णपणे बंद असते

   

  कामशेत या ठिकाणी आपण ट्रेकिंग व कॅम्पिंग या गोष्टी देखील करु शकता, मान्सून मध्ये येथील पॅराग्लायडिंग जरी बंद असली तरीही निसर्गाचा आस्वाद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

     

 करण्यासारखे किंवा पाहण्यासारखे काही | kamshet activities and sightseeing 

kamshet sightseeing
पॅराग्लायडिंग ट्रेकिंग कॅम्पिंग
निर्वाणा पाले ट्रेक लोअर वेंचर
इंडस पॅराग्लाइडिंग शिलाटणे ट्रेक सिएरा कॅम्पिंग
फ्लाय सह्याद्री टाकले ट्रेक कॅंम्प ग्रीनहाऊस
kamshet sightseeing
धबधबे सरोवर मंदीरे
उकसान धबधबा उकसान सरोवर कोंडेश्वर मंदिर
देउली धबधबा पावणा लेक एकवीरा देवी मंदिर
भाजे धबधबा शिरोटा सरोवर भैरी लेणी


जेवणाची आणि राहायची व्यवस्था 

कामशेत मुंबई पुणे हायवे लगत असल्याने या परीसरात अनेक धाबे आहेत जेथे आपल्याला शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळतात.

राहण्यासाठी कामशेत व नजीकच्या परीसरात कॅम्प साईट्स, रेसॉर्ट्स, वीला, अशे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

जवळील MTDC रेसॉर्ट्स २.३ किलोमीटर अंतरावर कार्ला येथे आहे.


कामशेत या ठिकाणी कसे पोहोचाल

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कामशेत पासून ४९ किलोमीटर अंतरावर आहे

पुणे ते कामशेत उपनगर रेल्वे सेवा उपलब्ध आहे‌ आपण पुण्यावरून थेट कामशेत रेल्वे स्टेशनला उतरु शकता.
आणि जर आपण मुंबई वरून येत असाल तर आपल्याला लोणावळा स्टेशनला उतरावे लागेल.

तसेच कामशेत येथे मुंबई पुणे आणि लोणावळ्या वरून टॅक्सी, खासगी आणि सरकारी बसेस नियमित चालू असतात 

  • मुंबई ते कामशेत हे अंतर १०० किलोमीटर इतके आहे.
  • पुणे ते कामशेत हे अंतर ४८ किलोमीटर इतके आहे.
  • नागपूर ते कामशेत हे अंतर ७४३ किलोमीटर इतके आहे.
  • रत्नागिरी ते कामशेत हे अंतर २८१ किलोमीटर इतके आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने