Saptashrungi devi चे पुरातन स्वयंभू मूर्तीरूप समोर आले



भारतातील १०८ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या  Saptashrungi devi चे पुरातन स्वयंभू मूर्तीरूप आले समोर आले आहे, हे मनोहारी रूप पाहण्यासाठी आपण वणी गडाला भेट देण्याच्या तयारीत असाल तर हा लेख नक्की वाचा!

Saptashrungi devi चे पुरातन स्वयंभू मूर्तीरूप समोर आले


देवीची मुर्ती ८ फुट उंच आहे. मुर्ती पाषाणात कोरलेली असून, मुर्तीला १८ भुजा आहेत. व देवीच्या १८ हातांमध्ये वेगवेगळी आयुधे आहेत. देवीच्या गाभाऱ्याला शक्तीद्वार, सुर्यद्वार, आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत.

सप्तश्रृंगी गडावर दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आणि या काळात देवीचा  श्रृंगार फळे आणि भाज्यांनी केला जातो.


श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवीचे मंदिर कुठे आहे 

सप्तश्रृंगी गड नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी-कळवण तालुक्यांच्या हद्दीवर असुन, हे गड सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम डोंगर रांगांमध्ये वसलं आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे.


Saptashrungi devi च्या मुर्ती संवर्धनाचे काम पूर्ण 

 सप्तश्रृंगी मातेच्या मुर्ती संवर्धनाचे काम २१ जुलै २०२२  पासून सुरू होते आणि तब्बल ६६ दिवसां नंतर दिनांक २६ सप्टेंबर २०२२ घटस्थापनेच्या दिवशी देवीचं मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.  

संवर्धनाचं काम चालू असताना श्री सप्तशृंगी देवी मूर्तीवरील जवळपास दोन हजार किलो शेंदूर लेप काढण्यात आला.  शेंदूर लेपन धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला व त्यासाठी कुठलीही रासायनं वापरण्यात आली नाही. 

खाली दिलेल्या फोटो मध्ये आपण मुर्ती मधील शेंदूर लेपन काढण्या आधीचं आणि नंतरचं फरक स्पष्ट पाहू शकत.


Saptashrungi devi च्या मुर्ती संवर्धनाचे काम पूर्ण


सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय 


भाविकांच्या राहण्यासाठी श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट मार्फत २१४ खोल्या असलेली धर्मशाळा उपलब्ध आहे‌. आणि तेथे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही.

      त्याच बरोबर २० रु देणगी आकारून प्रसाद रुपी भोजनाची व्यवस्था संस्थानाने केली आहे. या प्रसादालयात एक हजार भाविक एकाच वेळी पंगतीला बसू शकतात, भोजनाची वेळ सकाळी ११ ते २.३० व रात्री ७ ते ९.३० आहे.


saptashrungi devi ropeway ticket price

गडावर जाण्यासाठी रोपवे सेवा उपलब्ध आहे‌, रोपवे टीकीटाचे दर वयस्कांसाठी ९० रुपये तर लहान मुलांसाठी ४५ रुपये इतके आहे.


saptashrungi devi ropeway ticket price


सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात कसे पोहोचाल

गडापासुन जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ ५१ किलोमीटर अंतरावर आहे.

तर सर्वात जवळचे नाशिकरोड रेल्वे स्थानक ६५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच नाशिक वरुन बस सेवा देखील उपलब्ध आहे‌ 


  • मुंबई ते सप्तश्रृंगी गड हे अंतर २४२ किलोमीटर इतके आहे.
  • पुणे ते सप्तश्रृंगी गड हे अंतर सिन्नर मार्गे  २७२ किलोमीटर इतके आहे.
  • नागपूर ते सप्तश्रृंगी गड हे अंतर  ६८६ किलोमीटर इतके आहे.
  • रत्नागिरी ते सप्तश्रृंगी गड हे अंतर ठाणे मार्गे ५२९ किलोमीटर इतके आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने