नागझिरा अभयारण्य | nagzira wildlife sanctuary

नागझिरा अभयारण्य | nagzira wildlife sanctuary

तुम्ही जर विचाराल की नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणा एका जिल्ह्याचं नाव घेता येणार नाही, कारण नागझिरा अभयारण्य गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे.


नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे


हा वन्यजीव अभयारण्य १५२.८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरला आहे, येथे दुरपर्यंत कुठेच विज पुरवठा नाही हे या अभयारण्याचे विषेशन


Buffer zone and core area of nagzira wildlife sanctuary


नागझिरा अभयारण्यात प्रवेश करणाऱ्यासाठी चोरखमारा आणि पिटेझरी अशे दोन गेट्स आहेत.

 

नागझिरा अभयारण्यातील जैवविविधता 

हे अभयारण्य अनेक दुर्मिळ प्रजातींचे घर आहे.

येथे जवळ जवळ २०० वेगवेगळ्या पक्षांची नोंद केली गेली आहे, तर ३४ प्रकारचे सस्तन प्राणी येथे सापडतात, उभयचरांच्या ४ तर ३६ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती येथे आहेत.


नागझिरा अभयारण्यात आढळणारे काही सस्थन प्राणी

  • वाघ, बीबळ्या, जंगली मांजर, रानकुत्रा, रानगवा,स्मॉल इंडियन कस्तुरी मांजर, पाम कस्तुरी मांजर, लांडगा, अस्वल, पॅन्गोलिन, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, चार शिंगी काळवीट, माउस डियर,काकर, ऊदमांजर, ताडमांजर.


नागझिरा अभयारण्यात आढळणाऱ्या काही पक्षांच्या प्रजाती

  • बार हेडेड गूस,सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश,मोर, नवरंग, कोतवाल.


करण्यासारखे किंवा पाहण्यासारखे काही | activities and sightseeing 

येथे आपण पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, आणि जंगल सफारी आदी गोष्टी करू शकता.

तसेच येथुन काही अंतरावर हजारा धबधबा, इटियाडोह धरण, व अनेक मंदिरे आहेत आपण तेथे ही भेट देऊ शकता.


कोणत्या सीझन मध्ये नागझिरा अभयारण्यात जाणे सोयीचे ठरेल 

 हिवाळ्यात नोव्हेंबर ते मार्च दरम्यानचा काळ या अभयारण्यास भेट देण्यासाठी उत्तम आहे. थंडीच्या दिवसांत स्थलांतरित पक्षांच्या १४ प्रजाती येथे पाहायला मिळतात, हिवाळ्यात येथील तापमान ७ अंशापर्यंत सरकतो.

उन्हाळ्यात येथे यायचंच झालं तर सोबत सुती कपडे घेऊन या कारण उन्हाळ्यात इथला तापमान ४७ अंशापर्यंत पोहचतो.

पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान अभयारण्य बंद ठेवले जाते.


जेवणाची आणि राहायची व्यवस्था 

अभयारण्य क्षेत्राच्या बाहेर अनेक रेसॉर्ट्स, हॉटेल्स, आणि रेस्टॉरंट्स आहेत.

तसेच MTDC चे बोधलकसा रेसॉर्ट्स अभयारण्याच्या मांगझेरी गेट पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.


नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे कसे पोहोचाल 

नागपूर विमानतळ हे नागझिरा अभयारण्या पासून जवळचे विमानतळ आहे.

तीरोडा रेल्वे स्थानक नागझिरा अभयारण्या पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे.

तसेच सर्वात जवळचे बस स्थानक साकोली हे २२ किलोमीटर अंतरावर आहे.


  • मुंबई ते नागझिरा अभयारण्य हे अंतर ९३८ किलोमीटर इतके आहे.
  • पुणे ते नागझिरा अभयारण्य हे अंतर ८२५ किलोमीटर इतके आहे.
  • नागपूर ते नागझिरा अभयारण्य हे अंतर ११८ किलोमीटर इतके आहे.
  • रत्नागिरी ते नागझिरा अभयारण्य हे अंतर १०८० किलोमीटर इतके आहे.


आपण traveller आहात की tourist ?

नागझिरा अभयारण्य महाराष्ट्राच्या पुर्वेला वसलं आहे, आणि महाराष्ट्राच्या पुर्वेकडील भगाचा उल्लेख आला की आपल्या मधील बहुतेक लोकांचा स्वारस्य कमी होतो, कारण महाराष्ट्रात फिरायचे ठरले की आपण नेहमीच पश्चिम महाराष्ट्राला प्राधान्य देतो. आपल्या अशाच विचार करण्यामुळे आपण traveller न बनता एक tourist बनुन राहतो.

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने