महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे देवस्थान | हरिहरेश्वर (Harihareshwar) | harihareshwar temple

रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर हे गाव महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे देवस्थान | हरिहरेश्वर (Harihareshwar) | harihareshwar temple

महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे देवस्थान  | हरिहरेश्वर (Harihareshwar) |   harihareshwar temple
Image source - Flickr | images by- Dinesh Valke



कोकण किनारपट्टी लगत नयनरम्य असे हे देवस्थान, एका बाजूला हीरवेगार डोंगर तर दुसरीकडे अंतहीन अरबी समुद्र. नारळी पोफळीच्या बागांनी तर या परीसराच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली आहे.


श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून भारतभर प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील आणि भारतातील महत्त्वाचं देवस्थानं असुन हे गाव चार टेकड्यांच्या मधोमध वसलं आहे आणि गावाच्या वायव्य दिशेला श्री हरिहरेश्वराचं मंदिर आहे.

     
श्री हरिहरेश्वर मंदिराच्या बाजूला असणारे काळभैरवाचे प्रथम दर्शन नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी येथे प्रथा आहे.
    या दोन्ही देवळात दर्शन घेउन झाल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेची पायवाट डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जाते . या मार्गावरील शंभर दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात.
                 या वाटेने प्रदक्षिणा पूर्ण करत असताना समुद्राचं आणि डोंगराच्या एकजीव होण्याचं विलोभनीय दृश्य आपल्या मनात कायमचं घर करून जातं.

 हरिहरेश्वर बिच (Harihareshwar beach) 

 हरिहरेश्वर येथे आपल्याला खडकाळ आणि वालुकामय असे दोन्ही प्रकारचे समुद्र किनारे बघायला मिळतात, येथील समुद्र किनार्यांवर आपल्याला नीरव शांतता अनुभवायला मिळते.
हरिहरेश्वर बिच (Harihareshwar beach)
Image source-flickr| image by-Dinesh Valke




हरिहरेश्वर येथे करण्यासारखे किंवा पाहण्यासारखे आणखीन काही (harihareshwar sightseeing ) 

  • समुद्र किनारे : दिवेआगर, आणि श्रीवर्धन हे हरिहरेश्वर जवळील समुद्रकिनारे जथे आपण सुर्यास्त पाहू शकतो.
  • मंदिरे : कालभैरव योगेश्वरी, हनुमान व सिद्धिविनायक अशी चार मंदिरे या गावात आहेत.
  • टेकड्या : ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती अशा चार टेकड्या मंदिराच्या सभोवताली आहेत.


हरिहरेश्वर येथील राहण्याची आणि जेवणाची सोय 

हरिहरेश्वर येथे उत्तम शाकाहारी जेवण आणि उकडीचे मोदक मिळतात, तसेच हे कोकण किनारपट्टीवर असल्या कारणाने येथे मच्छी देखील सहज उपलब्ध आहे.

राहण्यासाठी येथे खासगी हॉटेल्स, रेसॉर्ट्स, होमस्टेस, आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह देखील आहे.

हरिहरेश्वर येथे कसे पोहोचायचे? हरिहरेश्वर येथे जाण्याचे मार्ग.


येथे आपण एस.टी. बस किंवा खासगी वाहनाने पोहोचू शकतो, मानगाव स्टेशन हे येथील जवळचे रेल्वे स्थानक आहे या रेल्वे स्थानकावरून हरिहरेश्वर साठी बस सेवा उपलब्ध आहे‌.

  • मुंबई ते हरिहरेश्वर हे अंतर २०० किलोमीटर इतके आहे.
  • पुणे ते हरिहरेश्वर हे अंतर मुळशी मार्गे १७५ किलोमीटर इतके आहे.
  • नागपूर ते हरिहरेश्वर हे अंतर अहमदनगर मार्गे ५०८ किलोमीटर इतके आहे.
  • रत्नागिरी ते हरिहरेश्वर हे अंतर दापोली मार्गे १४५ किलोमीटर इतके आहे

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने